चंद्रपूर :- साखरी पवनी 2 कोळसा खाणीतील MPCL कंपनीच्या कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 12 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू होते. आज दिनांक 12-11-21 रोजी केंद्रीय श्रम उपायुक्त रॉय साहेब तसेच वेकोलिचे मॅनेजर रेड्डी यांनी कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांनी चर्चा करून कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या यामध्ये शासकीय नियमानुसार आठ तास ड्युटी किमान वेतन नुसार पगार आठवड्यातून एकदा सुट्टी व कामगारांच्या बँक खात्यात पगार ह्या सर्व अटी कंपनीने मान्य केल्या. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची आज कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी कंत्राटी कर्मचारी सेनेचे कार्यध्यक्ष कैलाश तेलतुंमडे सचिव अमोल मेश्रम सबेरिया म्यानेजर एकंबर साहेब पर्सनल मनेजर रेड्डी पर्सनल मॅनेजर सोलनकी चड्डा कंपनीचे साइड इंचार्ज सूरज मुन हे उपस्थित होते कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला.
12 दिवसाच्या आंदोलनानंतर कामगारांच्या मागण्या पूर्ण
नोव्हेंबर १२, २०२१
0
Tags