-चंद्रपूर जिल्हा शहर माळी महासंघाच्या अध्यक्षपदी स्थानिक पठाणपुरा निवासी विजय चहारे यांची पुढील तीन वर्षाकरीता काल शनिवार दि.२आँक्टाेंबरला चंद्रपूरात पार पडलेल्या एका बैठकीत करण्यांत आली .चहारे यांची निवड महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी ठाकरे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुणराव तीखे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यांत आली .या पुर्वि सुध्दा त्यांनी ही धुरा यशस्वीरित्या सांभाळली हाेती .दरम्यान याच बैठकीत अन्य काही नियुक्त्यां करण्यांत आले असल्याचे माळी महासंघाच्या एका जेष्ठ पदाधिका-यांने आज सांगितले .सामाजिक कार्याची जाण असणां-या विजय चहारे यांची जिल्हा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेक मित्रमंडळीने व समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
चंद्रपूर जिल्हा शहर माळी महासंघाच्या अध्यक्षपदी विजय चहारे यांची निवड
ऑक्टोबर ०७, २०२१
0
Tags