Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्वा. सावरकरांच्या प्रेरणेतून व्यायामशाळेद्वारा बलशाली, निरोगी व देशभक्त युवक घडतील - हंसराज अहीर

सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात बुधवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं चंद्रपूर शहरातील तूकुम परिसरातल्या शिवनेरी बालोद्यान या बगिच्यात तयार केलेल्या हॉलचं बुधवारी उद्घाटन होतं मात्र या हॉलला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे आणि याच मुद्द्यावर हा वाद झाला शिवनेरी नाव असताना हॉलला सावरकरांचे नाव नको अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका होती माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन सुरू असताना हा वाद झाला मात्र हा वाद वाढत असल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांची हंसराज अहिर यांनी समजूत काढली आणि त्यानंतर हा वाद शांत झालानवनिर्मित व्यायामशाळा इमारतीचे विधीवत लोकार्पण

चंद्रपूर - स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर यांच्या कार्यातुन प्रेरणा घेत नवनिर्मित व्यायामशाळेतून बलशाली, निरोगी व देशभक्त युवक तयार होतील. धगधगते अग्नीकुंड असलेल्या देशभक्त वि. दा. सावरकरांच्या नावाने असलेल्या या व्यायामशाळेचा उपयोग वार्डातील सर्व नागरीकांनी घ्यावा. बलशाली व आरोग्य संपन्न युवक हिच राष्ट्राची मौल्यवान संपत्ती असल्याने तरूणांनी व्यायामाला प्राधान्य देत आपले आरोग्य अबाधित राखावे असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी स्वा. सावरकर व्यायामशाळा इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात केले. या लोकार्पण सोहळ्यामध्ये कसलेही राजकारण नसुन केवळ लोकांच्या आग्रहास्तव हे लोकार्पण करण्यात आले अअसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संन 2018 -19 अंतर्गत खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 26 लाख रूपये निधीनी बांधण्यात आलेल्या स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर व्यायामशाळा इमारतीचे लोकार्पण दि. 27 आॅक्टो. रोजी श्री अहीर यांचे शुभहस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास पूर्व महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, खुशाल बोंडे, राजेश मुन, अनिल फुलझेले, संदीप आवारी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, रविंद्र गुरणुले, मोहन चैधरी, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, पुष्पा उराडे, मायाताई उईके, शिलाताई चव्हान, शितल गुरणुले, वनीताताई डुकरे, शाम कनकम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्रयवीर सावरकर युवकांचे प्रेरणास्त्रोत व देशभक्तीचे प्रतिक होते. महापालिकेने प्रस्ताव घेवून सर्वानुमते या इमारतीला सावरकरांचे नाव दिले त्याबद्दल आभार मानतो असे सांगत अशा राष्ट्रीय विभुतींच्या राष्ट्रसमर्पित कार्याचा गौरव व प्रेरणा म्हणुन महानगरातील शिवाजी चैक, शहिद बाबुराव शेडमाके शहिदस्थळ, बाबुपेठ येथील नेताजी सुभाष चैकाचे खासदार निधीतुन विकास व सौदर्यीकरण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व पूर्व मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीसांच्या काळात लोकहिताची कामे प्रभावीपणे झाली व होत आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील मनपा व्दारे चंद्रपुरात सर्वत्रा विकास कामे होत आहेत. अमृत नळयोजनेमुळे पुढील 30 वर्ष पेयजलाची कमतरता भासनार नाही. देशात शंभर कोटी लसीकरण हे फार मोठे यश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी सौ. अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टुवार, मायातई उईके यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरीकांचा हंसराज अहीर व मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रप्रकाश गौरकर, निलेश हिवराळे, मायाताई मांदाडे, वंदना संतोशवार, श्रीकांत भोयर, पुरूषोत्तम सहारे, देवेंद्र मोगरे, अरूण तीखे, प्रमोद शास्त्राकार, अमीन शेख, धनराज कोवे, विनोद शेरकी, राजु घरोटे, मनोहर राऊत, सपना नामपल्लीवार, अरूणा चैधरी,पुरूषोत्तम सहारे, संजय खनके, पुनम तिवारी, गिता गेडाम, सिमा मडावी, ममता फाये, माया कोटगिलवार, मंगला शास्त्राकार, सिंधु चैधरी, चंदा ईटनकर, संगिता पिंपळशेंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बुक्कावार यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल डुकरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies