चंद्रपूर :- विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रियेमध्ये मोठा गोड होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे त्याचे कारणं मंजे महावितरणने विद्युत सहाय्यक पदाची जाहिरात काढताना स्पष्टपणे नमूद केले होते की विद्यार्थ्यांचे १० वी टक्के हे त्यांच्या सरासरी नुसार म्हणजे ६५० पैकी मार्क्स असायला हवे पण तसे न करता बेस्ट ऑफ फाईव्हच्या आधारावर ५०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि जाहिरातीत कुठेही डिप्लोमा (पाॅली/इंजिनिअरिंग) याचा उल्लेख नसताना डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांची निवड करून यादीत स्थान देण्यात आले आहे तसेच ८५ % असलेल्या विद्यार्थ्यांना निवड न करता काही विद्यार्थी असे पण निवडण्यात आले ज्यांना ४०-५० % टक्के आहे
ह्या सर्व बाबी मा. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपूरे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच चूका सुधारून योग्यरित्या पारदर्शी पद्धतीने पुढे निवड प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले हे सर्व आदेश देऊन सुध्दा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे
त्यांचे कारण असे कि मा. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपूरे यांनी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी अटी आणि शर्तीत बसणार नाही (जसे. बेस्ट ऑफ फाईव्ह, डिप्लोमा आणि कमी टक्केवारी असलेले विद्यार्थी) यांना कागदपत्रे पळताणी करताना बाद केले जाईल
पण जेव्हा यांना बाद करेल तेव्हा ५०% टक्के पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त होईल आणि उर्वरित पात्र विद्यार्थी हे ज्या संवर्गातील असतील तिथे त्यांची निवड केली जाईल आणि रिक्त झालेल्या ५०% जागा ह्या ओपनमधून भरल्या जातील म्हणजे अस होईल कास्टचा कट आॅफ हा जास्त आणि ओपनचा कट आॅफ कमी होईल यामुळे कास्ट मधून फार्म भरलेल्या विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि असे होऊ नये यासाठी येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रील ६ प्रशासकीय विभागातील विद्यार्थ्याचे एक शिष्टमंडळ तयार करून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी भेट घेऊन विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रियेमध्ये होत असलेला घोटाळा आणि कास्ट मधून फार्म भरलेल्या विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान थांबविण्यासाठी मा. मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकांत दडमल यांनी दिली. महत्वाचे म्हणजे हि चर्चा फेसबुक लाईव्ह मार्फत सर्व विद्यार्थी बघू शकणार आहे. विद्युत सहाय्यक पद भरती विषयी काही माहिती विचारायची असल्यास किंवा माहिती सांगायची असल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकांत दडमल ७७६७०७६४३५ उमेश कुळमेथे ८८०५९९९६७३ प्रशांत खोब्रागडे
९७६७३६९०३० संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.