ता.प्र.
जिवती : महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे. निसर्ग रक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेनी परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतिक संवर्धनाऐवजी संपविण्याचा प्रकार होत असून आदिवासींच्या समुहाचा अवमान थांबविण्यासाठी ‘रावण’ दहन प्रथा कायमची बंद करण्याची निवेदनातून दिली आहे.
आदिवासी समाजात राजा रावण महान आहे. महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहित होवू नये व महान यौद्धांची प्रतीमा डागाळण्याच्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा जाणीवपूर्वक सनातन समाज व्यवस्थेनी सुरू केली आहे. याला आदिवासी समाजाचा विरोध आहे.आजही देशातील दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात महात्मा रावणाची ३५२ मंदिरे असून राजाची पूजा केली जाते. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड व राज्याच्या मेळघाट तालुक्यात भक्तीभावाने राजा रावणाची पूजा अर्चना केली जात असून आदिवासींच्या महान राज्याची स्मृतीला अभिवादन केले जात आहे. मात्र सनातनी व्यवस्थेला बळकट करण्यासाठी ‘रावण’ दहन केले जाते. यामुळे आदिवासींच्या भावना दु:खावल्या जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘रावण’ दहन रूढी कायमची बंदी करावी, अशी मागणी सादर केलेल्या निवेदनातून आदिवासी समाज बांधवांनी केली.येथील जिवती तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आला यावेळी शिष्टमंडळात कोटनाके जिल्हाध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघ चंद्रपूर, सत्तरशाह कोटनाके, सिताराम मडावी, अजगर अली, सलीम शेख, सखाराम कोटनाके, सागर कोटनाके, गंगाधर आत्राम, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता