बल्लारपूर : 'वाचा आणि उठा' 👉एका प्राध्यापिकेच्या विनयभंग प्रकरणात बल्लारपूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी, (बीआयटी) बामणीचे दोन्ही प्राचार्य रजनीकांत मिश्रा आणि श्रीकांत गोजे यांना जिल्हा न्यायालयाने अंतिरिम जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी नऊ नोव्हेंबरला होईल. या दोन्ही प्राचार्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, विनयभंग आणि देशी कट्ट्याचे प्रकरण समोर आल्याने पालक आणि विद्यार्थी कमालीचे धास्तावले आहे. आधीच बीआयटी अनेक वादग्रस्त प्रकरणांनी गाजली आहे. त्यात आता या नव्या प्रकरणाची भर पडली.
पीडीतेच्या बदनामीमागे व्यवस्थापन
विनयभंग प्रकरणातील पीडीत प्राध्यापिकेची आणि सारथी असोसिएशनची समाज माध्यमावर बदनामी करणारा बीआयटीच्या कर्मचारी प्रमोद सराफ यांच्यावर बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे घाबरलेल्या सराफ याने सारथी असोसिएशनला झाल्या प्रकारबद्दल लेखी • माफीनामा सादर केला. समाज माध्यमावर बदनामीकारक मजकुरामागे •संस्थेचे कार्याध्यक्ष असल्याचा उल्लेख माफीनाम्यात आहे. माझ्याकडून गैरकृत्य झाले आहे. चूक झालेली आहे. कायदेशीर कार्यवाही करु नये. यापुढे माझ्याकडून चूक होणार नाही याची हमी लेखी पत्रातून दिली आहे.