Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मा.आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार व मनपाच्या पुढाकारातून नेताजी चौक बाबुपेठ येथे पोलीस चौकी
चंद्रपूर, ता. ७ : नेताजी चौक, बाबुपेठ परिसरात प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. येथे पोलीस बीट सुरु करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करुन देण्यात आली. आज सात ऑक्टोबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उदघाटन करण्यात आले.
शहरातील बाबूपेठ परिसरातील वैष्‍णवी आंबटकर या युवतीची निर्घृण हत्‍या झाली. मृत्‍यु प्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आंबटकर कुटूंबियांची भेट घेत त्‍यांचे सांत्‍वन केले. वैष्‍णवीच्‍या हत्‍येप्रकरणी प्रशासनाप्रती रोष निर्माण झाल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, याकरीता नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे परिसरात एक पोलीस बीट स्थापन करण्याची मागणी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा कार्यालयातर्फे पोलीस विभागास एक पोलीस बीट स्थापन करण्याकरीत जागेची व्यवस्था करुन देण्याबाबत या कार्यालयास सूचना केल्या. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेकरीता नेताजी चौक, बाबुपेठ या परिसरात पोलीस बीट उपलब्ध व्हावे, त्याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करुन देण्यात आली उदघाटन वेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपचे जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, शहरचे ठाणेदार अंभोरे, झोन १ च्या सभापती छबूताई वैरागडे, भाजपच्या गटनेत्या जयश्री जुमडे, नगरसेविका कल्पना बगुलकर,नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेवक श्याम कनकम, नगरसेवक प्रदीप किरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies