Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आशा वर्करच्या मुक्कामी ठिय्या आंदोलनची पाचव्या दिवशी सांगता
प्रतेक आशा वर्करच्या खात्यात जमा होणार 16 हजार

चंद्रपूर :--महानगर पालिका स्तरावर सर्व आशा वर्कर लोकांमध्ये जनजागृती,आरोग्याची काळजी घेणे,महआयुष सर्वे करणे, कोवि ड-19 शी निगडित ईतर कामे अहो दिवसरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता करीत आहेत. सदर बाबी ह्या कामाचा भाग असल्या तरी देखील हे कर्मचारी आपल्या जीवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त मनपा तर्पे एक आदेश काढून आगस्ट 2020 पासून मासिक चार हजार रुपये प्रोत्साहन भत्ता कोरोना काळ असे पर्यंत देण्याचा निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी डिसेंबर पर्यंत करण्यात आली.परंतु जानेवारी पासून चा थकीत मोबदला देण्यासाठी महानगर पालिका चालढकल करीत असल्याने आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात 26 ऑक्टोंबर पासून महानगर पालिका कार्यालय समोर बेमुदत मुक्कामी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मनपा प्रशासन कोरोना काळात आशा वर्कर ला प्रतीमाह 4 हजार रु.देण्याचे मान्य केले होते ते जानेवारी पासून थकीत आहेत ते आजता गायत दिले नाही ,ते मिळवण्यासाठी आय टक च्या नेतृत्वात मागील 3 महिन्या पूर्वी मनपा कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले व जोपर्यंत थकीत प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तो पर्यंत हटा यचं नाही अशी टाट र भूमिका आंदोलन कारी महिलांनी घेतली होती.
या पूर्वी सुद्धा अनेक निवेदन आयुक्त , महापौर मॅडम तसेच सर्वच नगरसेवक यांना दिले आहेत परंतु सातत्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.मध्यंतरी दि.12 एप्रिल 2021 मध्ये आशा वर्करणी तीव्र आंदोलन छेड ले होते तेव्हा सदर आंदोलनाची दखल मंत्री तथा पालकमंत्री विजय भाऊ वड्डे टिवार यांनी घेत आयुक्त मोहिते यांच्याशी चर्चा घडवून आणली होती तेव्हा आयुक्त यांनी जानेवारी ते सप्टेंबर 2021 पर्यंत थकीत प्रोत्साहन भत्ता देण्याचे मान्य केले होते परंतु आता पर्यंत पाच महिने झाले तरी त्याची अंमलबजावण झाली नाही .त्यामुळे आशा वर्कर आक्रमक भूमिका घेत जानेवारी पासूनचा थकीत कॉरोना प्रोत्साहन भत्ता द्यावा.यासाठी 26 ऑक्टोंबर पासून मनपा कार्यालयात आय टक च्या नेतृत्वात मुक्कामी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आला होता . शेवटी 5 व्या दी.30 ऑक्टोंबर 2021 रोजी नगरसेवक मा.नंदू नगरकर, सुनिता लोधीया ,अमजद अली,संगीता भोयर यांनी आंदोलनाला भेट देऊन मा.मंत्री तथा पालक मंत्री विजय भाऊ वड्डे टीवार यांच्या सोबत प्रतक्ष चंद्रपूर येथील रेस्ट हाऊस मध्ये आय टक संघटनेच्या प्रतिनिधी सोबत चर्चा घडवून आणली आणि चर्चे अंती प्रतेक आशा वर्कर ला प्रति महा 4 हजार रुपये नुसार 4 महिन्यांचे 16 हजार रुपये असे एकूण 20 लाख 48 हजार रुपयाचा चेक प्रतक्ष मंत्री तथा पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी रात्रौ 7 वाजता महानगर पालिका कार्यालय समोर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी मा.आयुक्त मोहिते यांना दिल्या नंतरच 5 व्या दिवशी मुक्कामी ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉ.विनोद झोडगे ,कोल माईन संघटनेचे नेते कॉ.प्रदीप चीताडे , आशा वर्कर संघटना शहराधक्ष कॉ.सविता गटलेवा सचिव कॉ.प्रतिमा कायरकर यांनी दिली व आंदोलन सुरू असताना मदत करणाऱ्या महापौर,उपमहापौर,सर्व नगरसेवक,आणि विविध पार्टीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.त्या सर्वांचे संघटनेचे अध्यक्ष कॉ.विनोद झोडगे यांनी आभार मानून आंदोलन मागे घेत असल्याची माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies