भद्रावती नगर परिषद चे नगरसेवक तथा भद्रावती शहराचे शिवसेना शहर प्रमुख श्री नंदू पढाल यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रहार संघटना भद्रावती तालुका तर्फे श्री नंदू पढाल यांचा शिवसेना कार्यालय येथे शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या बद्दल या संघटने तर्फे निवेदन देण्यात आले, यावेळी श्री नंदू पढाल यांनी जिल्हा नियोजन समिती तर्फे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री शंकर मिरे सर, उपाध्यक्ष श्री प्रभाकर मेंगरे सर, कोषाध्यक्ष श्री रविकांत टोंगे सर, श्री मोरेश्वर विंदे सर, श्री लटारी क्षीरसागर सर, श्री धनराज मगरे सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रहार शिक्षक संघटना भद्रावती तालुका तर्फे श्री नंदू पढाल यांचा सत्कार
ऑक्टोबर ०४, २०२१
0
Tags