चंद्रपूर : कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात होता. त्या लाटेत अनेकांच्या मृत्यू देखील झाला. कुटुंबातील कर्ता माणूस मरण पावल्याने जीवन जगायचे कसे असा प्रश्न कुटुंबीयांपुढे पडला. अशीच घटना औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रदीप धानोरकर यांच्या कोरोनाचा दुसऱ्या लाटेवेळी मृत्यू झाला. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या पत्नीला कंत्राटी नोकरी व आज आर्थिक मदत केली. वंचितांच्या सोबत नेहमी मी खंबीर पणे उभी असणार असे यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हटले.
यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, वरिष्ठ अधिकारी श्री. जाधव, प्रकल्पग्रस्त मृतकाचे पत्नी नंदा प्रदीप धानोरकर, दोन मुली, आई तसेच प्रकल्पग्रस्त महादेव डुडुरे, प्रवीण पिदूरकर, चेतन देवतळे, संजय ठाकरे, सचिन गोरे, नितीन आवारी, ओंकार घोरपडे, विठ्ठल लाटेलवर, रुपेश देरकर, प्रमोद गरमडे यांची उपस्थिती होती.
प्रकल्प ग्रास्तांचे अनेक प्रश्न आहेत. ते मार्गी लावण्यासाठी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी आग्रही असतात. जिल्ह्यात अनेक प्रकल्प उभे आहेत परंतु त्यांच्या शेती अधिग्रहण करून त्यांचाच भूमिहीन व्हावं लागलं. प्रकल्पग्रस्त कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला कमी पगाराच्या नोकरीवर काम करीत असतात. त्यांना स्थायी नोकरी व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी नेहमी आग्रही राहील असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.