Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बरांज खुल्या कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात खाण बंद आंदोलनप्रकल्पग्रस्त शेतकरी तथा बेरोजगार युवकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


चंद्रपूर :-
बराज खुली कोळसा खाण ही सण २००७ पासून कार्यरत आहे. सदर कोळसा खाणीकरीता एकुण १४५७ हे. आर. जमिन संपादीत करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावात संपादीत करत असतांना तत्कालीन खासदार हंसराजजी अहीर यांनी संघर्ष करून शेतकऱ्यांना शेतजमीनीचा उचीत भाव मिळवून दिला. पुनर्वसन, नौकरी उर्वरीत शेती संपादीत करणे व इतर समस्यांसाठी संघर्ष सुरू असतानांच सन २०१४ मध्ये मा. सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशान्वये सदर कोळसा खाणीचे आवंटन रदद करण्यात आले. त्यानंतर ही कोळसा खाण कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. व्दारा प्रत्यक्ष स्वरूपात डिसेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आली. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या व कामगांराच्या समस्या न सोडविता कोळसा खाण सुरू झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. परीणामी दि. १७ एप्रील २०२१ रोजी तहसील कार्यालय भद्रावती येथे प्रकल्पग्रस्तू व कामगार यांचे वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी मा.आ. सुधीरजी मुनगंटीवार यांनी भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणुन घेवून जिल्हा प्रशासनाला आणि कंपनी प्रशासनाला कळविले किंबहुना बैठका सुध्दा घेतल्या पंरतू कंपनी व जिल्हा प्रशासनाची भुमीका नकारात्मक असल्याने आजपर्यंत खालील मागण्यांची पुर्तता झालेली नाही. त्या करीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १३ आक्टोंबर २०२१ रोजी खाण बंद आंदोलन करण्यात येत आहे..

प्रकल्पग्रस्त शेतकरी, गावकरी व कामगार यांच्या प्रमुख मागूण्या.

बराज खुली कोळसा खाण प्रकल्पात व कंत्राटी कंपन्यांमध्ये शेकड़ो कामगार हे बाहेर राज्यातील आहे. त्यामुळे स्थानीक जिल्हयातील बेरोजगार युवकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्याकरीता सदर प्रकल्पात किमान ८० टक्के कामगार स्थानीक म्हणजेच प्रकल्पग्रस्त व चंद्रपूर जिल्हयातील रहीवासी असावेत.

बराज मो. व चेकबंराज या दोन्ही गांवाचे ग्राम पंचायत रेकार्डनुसार तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अदयावत पुनर्वसन धोरणानुसार दोन्ही गावांचे तात्काळ पुनर्वसन करून नमुद तरतुदी नुसार आर्थिक मोबदला देणे. ● प्रकल्पबाधीत कुंटुंबातील व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरीमध्ये तात्काळ सामावुन घेणे. किंवा त्याऐवजी आर्थिक मोबदला देणे. पुर्वीचे कार्यरत प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगांराना सुधारीत नियुक्तीपत्र देणे. माहे एप्रील २०१५ पासुनचे उर्वरीत थकीत वेतन अदा करणे, नविन वेतन निर्धारण करून माहे डिसेंबर २०२० पासुनचे थकीत वेतन अदा करणे. नियमानुसार कामगांराना मिळणाऱ्या मोफत सुविधा पुरविणे ई. कंपनी प्रशासनाने एकुण संपादीत जमीनीपैकी ५० टक्के शेत जमीन कृषि योग्य करून ७ वर्षानंतर शेतकऱ्यांना परत करण्याचे मान्य केलेले आहे त्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५० टक्के शेत जमीन कृषि योग्य करून देण्यात यावी किंवा त्याऐवजी आजच्या बाजार मुल्यांनुसार शेतजमीनीची एकमुस्तू आर्थिक मोबदला देण्यात यावा. बंराज मो. व चेकबराज या दोन्ही गांवाचे पुनर्वसन होत असल्यामुळे व तेथील ९५ टक्के शेती व सरकारी रस्ते कंपनीने संपादीत केल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती करणे शक्य नाही करीता उर्वरीत शेत जमीन कंपनी प्रशासनानी तात्काळ संपादीत करावी व शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना प्रकल्पात नोकरीत सामावून घेण्यात यावे, बंराज खुली कोळसा खाण प्रकल्पात कार्यरत कंत्राटी कंपन्यामध्ये उर्वरीत बेरोजगार प्रकल्पास्तांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रकल्पात उपलब्ध असणाऱ्या स्वयम रोजगाराच्या संधीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे. वरील सर्व मागण्या हया रास्त असुन स्थानीक प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगार व जिल्हयातील बेरोजगार युवक यांच्या हिताचे आहेत. तरी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा बेरोजगार युवकांनी हजारोंच्या संख्येने आंदोलनात उपस्थित राहुन सहकार्य करावे.

असे आवाहन श्री. देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रपूर, डॉ. मंगेश गुलवाडे अध्यक्ष भाजपा महानगर, चंद्रपूर श्री. नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री, भाजपा चंद्रपूर, श्री. प्रविण ठेंगणे, प्रकल्पग्रस्तु तथा सभापती पंचायत समिती, भद्रावती श्री नरेंद्र जिवतोडे तालुका महामंत्री भद्रावती, श्री. यशवंत वाघ जि.प. सदस्य श्री. प्रविण सुर जि.प. सदस्य श्री. सौ. मनिषा ठेंगणे सरपंच ग्रा.पं. बंराज मोकासा श्री. रमेश भुक्या उपसरपंच ग्रा.पं. बंराज श्री. संजय ढाकणे, श्री. विजय रणदिवे, श्री. लक्ष्म्ण भुक्या, श्री. मनोहर बोढाले, श्री. श्रीराम महाकुलकर, श्री. श्रीनिवास ईदनुर ग्रा.प. सदस्य्, श्रीमती. गीरजा पानघाटे ग्रा.पं. सदस्य श्री. भीमा कुमरे, ग्रा.पं. सदस्य, श्री. सोमेश्वर कुळमेथे, श्री. सुरेश चापले, श्री. प्रभाकर कुळमेथे, श्री. रवी डोंगे, श्री. राकेश बोमनवार व इतर सर्व प्रकल्पग्रस्त यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies