Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महानिर्मितीच्या बोगस जाहीरातीच्या नावाखाली बेरोजगारांची लुट!
प्रादेशिक वर्तमान पत्राला देण्यात आली होती बोगस जाहिरात !
चंद्रपूर : थर्मल पॉवर स्टेशन उर्जानगर येथील महानिर्मिती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित उर्जानगर या नावाने डाटा ऑपरेटर या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने रेज्युम नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून त्या बाबतचे सविस्तर सुचना महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या http://www.maha.ganco.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही या जाहिरातीत सांगितले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना आपल्या हाताला काम मिळेल या उद्देशाने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र ती जाहीरातच बनावट असल्याचे कळताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला, ही जाहिरात एका दैनिकांत प्रसिद्ध झाल्याने ही जाहिरात बनावट असू शकतच नाही असे अनेकांना वाटत होते. मात्र ही जाहिरात बनावट असून सदर जाहीराती बाबत महानिर्मिती कंपनीचा काहीही संबंध नसून सदर जाहीराती अनुसरून कुणीही अर्ज सादर करू नये याबाबत महानिर्मिती कंपनी जबाबदार नसल्याचे महानिर्मिती कंपनीतर्फे खुलासा व्दारे सांगण्यात आले आहे. ही जाहीरात 8 आक्टोंबर रोजी दै. लोकमत या प्रादेशिक दैनिकात प्रसिद्ध झाली असून 16 आक्टोंबर ला यासंबंधातिल उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन या जाहिरातीत करण्यात आले आहे, यासंदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची उपमुख्य कार्यकारी ला यासंबंधातिल उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थीत रहावे, असे आवाहन या जाहिराती मधून करण्यात आले आहे, यासंदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची उपमुख्य कार्यकारी अभियंता यांनी सदर जाहिरात ही बोगस असल्याची माहिती खुलासा एका पत्राद्वारे केला आहे.
बेरोजगारांना लूटमार करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय!
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारांना रोजगाराच्या नावाने लूटमार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. एखाद्या प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये या संबंधात जाहिरात प्रकाशित होते, त्यानंतर ही जाहिरात खोटी आहे असच संबंधित मोठ्या विभागाला सांगावे लागते, त्याची रितसर तक्रार ही पोलीस स्टेशन मध्ये केले आहे. पोलिसांनी तपास करतांना शासकीय विभागाची आलेली ही जाहिरात कुणी दिली, त्यांचे बिल ज्या विभागाशी ही जाहिरात संबंधित आहे, त्यांनी दिले की परस्पर कुणी दिले, यांची चौकशी करायला हवी. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये बेरोजगारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली असे सांगितले जाते. शासकीय विभागाचे जाहिराती या शासन नियमाप्रमाणेच वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होत असतात. सर्वप्रथम शासन जाहिरातीच्या शासकीय आदेश निघतो, ज्या विभागाची जाहिरात आहे त्या विभागाला नंतर बिल पाठविले जाते त्यानंतर ते बिल मंजूर होते. हा शासकीय नियम आहे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मधून निघालेल्या जाहिरात चे बिल, जाहिरात देणारे यांची चौकशी व्हायलाच हवी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies