चंद्रपूर :- गतवैभव मिळविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते : परिश्रम घेत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात मात्र नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शुभेच्छा देताना काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा विसर पडला. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांची छायाचित्रे शुभेच्छा फलकावर आहेत. मात्र, वडेट्टीवार यांना यातून डावलण्यात आले. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणूक येऊ घातली आहे. यापार्श्वभूमीवर पक्षांतर्गत दुफळीचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक चांगलेच अस्वस्थ झाले आहे.
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा विसर
ऑक्टोबर ०८, २०२१
0
Tags