Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर मनपात भाषिक वादचंद्रपूर : चंद्रपूर मनपाची आमसभा तब्बल दीड वर्षांनी ऑफलाईन पद्धतीने सोमवारी घेण्यात आली. यात अनेक दिवसांनी सर्व सदस्य एकत्रित आले. यावेळी मराठी-हिंदी भाषेवरून सभागृहात वाद झाला.

वडगाव प्रभागाच्या नगरसेविका सुनीता लोढीया यांनी विविध प्रश्न घेऊन चर्चा करीत होत्या. यावेळी त्या प्रारंभी मराठीत बोलल्या. मग, त्यांनी हिंदीत मुद्दे मांडणे सुरु केले. त्यात मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी सभागृहात कामकाजाची भाषा कोणती असा प्रश्न करीत हिंदीत बोलू नये, मराठीत बोला असा आग्रह धरला. त्यावरून हिंदी- मराठी भाषेचा मुद्दा सभागृहात तापला. त्यात शिवसेना नगरसेवक सुरेश पचारे यांनीही खतपाणी घालत सचिन भोयर यांची बाजू उचलून धरली. तेव्हा लोढीया यांनी आपण मराठीत बोलू शकतो हे स्पष्ट केले. त्यासाठी कुण्या नगरसेवकाने सल्ला देण्याची गरज नाही, असे उत्तर दिले. लोढीया यांनी आपण जन्मतः मराठी असल्याचे सांगत विवाहानंतर हिंदी कुटुंबियांत असलयाने हिंदीचा वापर जास्त होत असल्याचे सांगितले. शिवाय गुजराथी आणि मराठी भाषादेखील व्याकरणासह येत असल्याचे नमूद केले. मात्र, भाषीक वाद संपला नाही. हिंदी भाषिक काही सदस्यांनी मराठी बोलण्याच्या आग्रहावर आक्षेप नोंदविला. आम्हाला मराठी नीट येत नाही आम्ही कशी बोलायची? असा प्रश्न उपस्थित केला. चंद्रपूर मनपात मराठी, हिंदी, तेलूगू, बंगाली आणि इतर उपभाषिक सदस्य आहेत. अशावेळी मनपाच्या सभागृहात फक्त मराठीतच बोला, असे निर्बध घालणे संयुक्तिक आहे का? की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मराठी आवश्यक आहे ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies