चंद्रपूर :- कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाला गती देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज दि.27 ऑक्टोबर 2021 रोजी भाजप युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर भाजप महामंत्री रवीभाऊ गुरनुले तुकूम मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे भाजप नगरसेविका शीतलताई गुरनुले यांचा मार्गदर्शनात सतीश नामदेवराव तायडे यांचा जनसंपर्क कार्यालयात कोवीड लसीकरण मोहीम राबवण्यात आले या मोहिमेत प्रभागातील 54 नागरिकांनी सहभाग घेऊन लसीकरण करून घेतले तसेच कोविड लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चा तर्फे कोवीड लसीकरण मोहीम संपन्न
ऑक्टोबर २७, २०२१
0
Tags