भद्रावती:- कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाला गती देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा प्रमाणात पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच भद्रावती शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी लसीकरण केंद्रावर लसींचा ठणठणाट आहे. असे असताना भद्रावती शहराला कोरोना लसीकरणात आघाडी मिळवून देण्याचे काम शिवसेना व युवा सेना करीत आहे. भद्रावती येथे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन मत्ते व शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदूभाऊ पढाल यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना तालुका समन्वयक श्री घनश्याम आस्वले व युवासेना शहर समन्वयक श्री गौरव नागपुरे यांच्या नेतृत्वात दिनांक 7 आणि 8 ऑक्टोबरला भद्रावती येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात कोवीड लसीकरण मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत 190 नागरिकांनी सहभाग घेऊन लसीकरण करून घेतले तसेच कोविड लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक श्री नंदू पढाल, नगरसेवक श्री राजू सारंगधर, तालुका समन्वयक श्री घनश्याम आस्वले युवा सेना , युवा सेना शहर समन्वयक श्री गौरव नागपुरे , श्री येशू आरगी, राजू लांबट, सतीश आत्राम, राहुल खोडे, गोविंदा रुयारकर, शानु दिवटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
भद्रावतीत युवा सेना तर्फे कोवीड लसीकरण मोहीम संपन्न
ऑक्टोबर ०९, २०२१
0
Tags