Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास मनपाच्या इमारतीत डुकरे सोडू - अजय सरकार


चंद्रपूर :- तब्बल दीड वर्षानंतर चंद्रपूर महानगर पालिकेची आमसभा सोमवारी पहिल्यांदा ऑफलाइन घेण्यात आली. कोरोनामुळे गेले दीड वर्ष ऑनलाइन आमसभांनाच परवानगी होती. कोरोनारुग्ण संख्या कमी झाल्याने जवळपास कोविड निर्बंध उठविण्यात आले. त्यामुळे सोमवारी राणी हिराई सभागृहात ऑफलाइन आमसभा पार पडली. आमसभेत नगरसेवक अजय सरकार यांनी बंगाली कॅम्प, इंदिरा नगर प्रभागत मोकाट डुकरांचा उपद्रव आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास मनपाच्या इमारतीत डुकरे सोडू, असा इशाराही नगरसेवक अजय सरकार यांनी दिला.

नगरसेवकांनी शहरातील विविध समस्यांकडे आमसभेत लक्ष वेधले

नगरसेविका सुनिता लोढीया यांनी शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. शहरात रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहेत. मात्र, या रस्त्यांवर काही व्यावसायिक वाहने पॉकिंग करीत आहे. तर काही ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहन विक्री करणाऱ्यांनी रस्त्यावर वाहने पार्किक करून रस्ते गिळंकृत केले आहे. पुलाखाली अतिक्रमण वाढले, रस्त्याचे ऑडिट केले जात नाही. नवीन रस्ते फोडून त्याच ठिकाणी पुन्हा रस्ते केले जात आहे. या बाबीकडे मनपाने गांभीर्याने लक्ष देत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली. नगरसेवक सुरेश पचारे यांनी अमृत पाणीपुरवठा योजनेद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी दूषित पाणी भरून आणलेली बॉटलच महापौर, आयुक्तांच्या समोर ठेवली. वंदना जांभुळकर, प्रदीप किरमे यांनी तुंबलेल्या नाल्याकडे लक्ष वेधले. तीन-तीन महिने नाल्या उपसल्या जात नाही. मजूर मागूनही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागत असल्याचे त्यांनी आयुक्त आणि महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. तर शाम कनकम यांनी लालपेठ आणि रयतवारी येथील शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. या दोन्ही ठिकाणी मनपाद्वारे शाळा चालविण्यात येतात. येथे गरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या चार वर्षांपासून या शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधत आहे. मात्र, लक्ष देण्यात येत नसल्याची खंत व्यक्त केली.महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश माहिती, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांच्या उपस्थितीत ही आमसभा पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies