चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील 'डॅशिंग' नगराध्यक्ष म्हणून सदोदीत लोकांच्या स्मरणात राहतील, असे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी उर्फ धन्नू महाराज यांचे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. ते १९८५ आणि १९९२-९३ मध्ये चंद्रपूरचे नगराध्यक्ष होते. त्यांची कारकीर्द सर्वार्थाने गाजली. चंद्रपूर नगरपालिकेची घडी बसविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. प्रशासकीय कामकाजावर त्यांची पकड होती. धन्नू महाराज हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना चंद्रपूर येथील त्यांचे राहते घरी आणण्यात आले. मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी १ वाजता जटपुरा गेटजवळील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे.
माजी नगराध्यक्ष धन्नू महाराज यांचे निधन झाले
ऑक्टोबर ०५, २०२१
0
Tags