पीडित महिलेला तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागावी लागली दाद
बल्लारपूर पोलिसांची भूमिका संशयास्पद
चंद्रपूर : बल्लारपूर येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) पीडित प्राध्यापिकेने घटना घडल्यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनला ६ तारखेला तक्रार देण्यासाठी गेले असता बल्लारपूर पोलिसांनी तक्रार घेतली नाही अखेर पीडित प्राध्यापिकेला पोलिस अधीक्षकांकडे दाद मागावी लागली. त्या नंतर दोन प्राचार्यांविरुद्ध महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २ प्राचार्यांवर एका शिक्षिकेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी अंतर्गत बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरण प्रकरण बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील असून दि. ६ ऑक्टोबरला अभियांत्रिकीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा व पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे (रा.बल्लारपूर) यांनी महाविद्यालयातील एका शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना आमच्या विरोधात भडकवतात यावरून भांडण केले. या भांडणात दोन्ही प्राचार्याने शिक्षिकेचा हात ओढला व विनयभंग केला, असा आरोप शिक्षिकेने केला आहे.
सदर प्रकरणी पीडित प्राध्यापिका बल्लारपूर पोलिसात ६ तारखेला तक्रार देण्यासाठी गेले असता शिक्षिकेला तक्रार नघेता समस देण्यात आली. व शिक्षिकेला आपल्या गावी पाठविण्यात आले. त्यानंतरही प्राचार्य तर्फे शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि जीवे मारण्याची मारण्याची धमकी देत होते. शेवटी दिनांक १७ ऑक्टोबरला ( राविवरला) शिक्षिकेने दोन्ही प्राचार्या विरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पिडीत प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून दोन्ही प्राचार्यांविरुद्ध विनयभंग व जीवेमारण्याच्या धमकी अंतर्गत ३५४, ३५४ (अ), ३५४(अ)(१)(आय)३५४(ब), ३५४(५), ५०६,५०९,३२३ भदवी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रमोद रासकर करीत आहे.