Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर महानगर पालिकेचे स्वच्छतादूत म्हणून प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांची निवड
चंद्रपूर, ता. १४ : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे दरवर्षी शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी तसेच त्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी स्वच्छतादूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेङर) म्हणून प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांची निवड करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छतेसंदर्भात विविध अभियान, उपक्रम, जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. नागरिकांमध्ये याविषयी व्यापक प्रसार करण्यासाठी स्वच्छतादूत म्हणून प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. आमटे यांनी ङिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले आहे.
लोक बिरादरी प्रकल्प ( २००२ पासून), लोक बिरादरी प्राथमिक, माध्यमिक आणि जुनिअर काॅलेज, महारोगी सेवा समिती , वरोरा येथे पदाधिकारी आहेत.
भामरागड तालुक्यातील माडिया गोंड आदिवासी बांधवासाठी सामाजिक सेवा देत आहेत. ओला व सुका कचरा याचे वर्गिकरण, ओल्या कचऱ्याचे विघटन घरच्या घरी करणे, त्यापासून उत्कृष्ट असं खत निर्माण निर्माण करण्याचे प्रयोगदेखील केले आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम आणि जागृतीसाठी योगदान देत आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देणे, जनजागृती, लोकांना पाण्याचे महत्त्व समजावे, यासाठी घरच्या घरी वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याची बचत कशी करायची विहिरीची व कूपनलिकेची पाण्याची पातळी कशी वाढवावी याचे प्रात्यक्षिक प्रयोग करण्यात येणार आहेत.
शहरातील वाढते प्रदूषण थांबावे यासाठी स्वतः आठवड्यातून दोनदा इंधन विरहित वाहनांचा वापर करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies