राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे भोवले
: नुकत्याच आटोपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याप्रकरणी प्राप्त गंभीर तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने हिंगणा तहसीलदार संतोष खांडरेंसह नायब तहसीलदार संध्या खोंडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
या आदेशानंतर प्रशासकीययंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली. जिल्ह्यात शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार चर्चा होती. मात्र, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व तहसीलदार संतोष खांडरे यांनी निलंबनाचा कुठलाही आदेश आपल्याला प्राप्त झाला नसल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश १४ ऑक्टोबरला काढण्यात आले. आदेशात नमूद आहेकी, तहसीलदार संतोष खांडरे, नायब तहसीलदार संध्या खोडे आणि हिंगणा तहसीलमधील इतरांनी डिगडोह - इसासनीसाठी जिल्हापरिषदेची मतदार यादी तयार करताना अनियमितता केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त होत्या. दरम्यान, डिगडोह - इससानीमधील तीन मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन पोहोचल्याच नाही. परिणामी, मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अहवाल ५ ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाला सादर केला अहवालानुसार, मतदार यादीतील भाग क्रमांक २८२ आणि २८३ हिंगणा विधानसभा विभाग डिगडोह - इससानी मतदार यादीत समाविष्ट नव्हता. परिणामी, दोन हजार ४९४ मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे निकालावर परिणाम झाला, अशा तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या. तहसीलदार, नायब तहसीलदार आणि इतरांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावावी, तशा स्वरूपाचे आदेश विभागीय आयुक्त नागपूर व अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांना देण्यात आले. उलटट पाली, अहवाल आयोगाला सादर करण्याच्या सूचना आहे. मात्र, अद्यापपर्यंत निलंबन आदेश प्राप्त झाला नसल्याचे म्हणणे तहसीलदार खांडरे यांचे आहे.
चंद्रपूरचे स्थायिक असलेले संतोष खांडरे यापूर्वी चंद्रपूरला तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना त्यांच्या कार्यकाळ खुपच वादग्रस्त राहीला आहे.त्यानंतर त्यांची नागपूर येथे बदली झाली चंद्रपूर मध्ये असलेल्या त्यांच्या अमाप संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यापूर्वी चंद्रपूरात करण्यात आली होती. लिपिक म्हणून नोकरीवर लागलेल्या संतोष खांडरे यांचे प्रमोशन हे चंद्रपुरात तहसीलदार या पदापर्यंत झाले होते त्यांच्यावर जिल्ह्यातील एका वरिष्ठ नेत्याचा वरदहस्त असल्यामुळें जिल्ह्यातील कोणत्या तक्रारीवर कधीही कारवाई करण्यात आली नाही अशी चर्चा जिल्ह्यामध्ये आज सुरू आहे. निवडणुकीदरम्यान शासकीय कामांमध्ये दिरंगाई केल्याने संतोष खांडरे यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.