Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार




मूल : बफर वनपरीक्षेञ मूल अंतर्गत काटवन नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५६ मध्ये स्वतःची गुरे चारत असताना झुडपात बसलेल्या वाघाने मूल लगतच्या चिचोली येथील गुराखी राजेंद्र नामदेव ठाकरे (४२) याचेवर दुपारी ३.३० वा. चे सुमारास हल्ला करून ठार केले आहे. वाघाने हल्ला करताच राजेंद्र ठाकरे यांनी आरडाओरड केल्याने सदर घटना स्थळापासुन काही दुर अंतरावर गुरे चारणा-या एका गुराख्यास सदर घटना लक्षात आली. सदर घटनेची माहीती त्याने ग्रामस्थांसह मृतक राजेंद्र ठाकरे याच्या कुटूंबियाला दिली. सदर घटनेची माहीती वनविभाग आणि पोलीसांनाही कळविण्यात आल्यानंतर वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर, क्षेत्ररक्षक जोशी आणि वनरक्षक बंडु परचाके यांनी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने राजेंद्र ठाकरे यांचा शोध घेतला तेव्हा घटनास्थळापासुन काही दुर अंतरावर राजेंद्र ठाकरे यांचे रक्ताने माखलेले पार्थीव सापडले. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मौका चौकशी करून मृतक राजेद्र ठाकरे यांचे पार्थिव शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या स्वाधीन केले. मृतक राजेंद्र ठाकरे यांचे पश्चात पत्नी दोन मूली आणि एक मुलगा आहे. वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणुन २५ हजार रूपये मृतकाच्या पत्नीलादिले. वाघाच्या हल्ल्यात कर्ता पुरुष गेल्याने मृतक राजेंद्रचे कुटुंब उघड्यावर पडल्याने वनविभागाने मृतकाच्या पत्नीला मोठी आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies