विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आ. आशीष शेलार , श्री लद्धाराम नागवानी यांचीही विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.
या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , उपमहापौर राहुल पावड़े ,महानगर भाजयुमो महामंत्री सुनील डोंगरे, भाजयुमो महानगर सचिव सत्यम गाणार आदिनी आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.