Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

उमरेड येथे महात्मा गांधी जयंती साजरीप्लास्टिक मुक्त उमरेड करण्याचा संकल्प

नेहरू युवा केंद्र ,नागपूर शिवसाम्राज्य ग्रुप उमरेड च्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जी यांची जयंती साजरी करण्यात आली व स्वच्छ भारत (CLEAN INDIA) कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला . (Clean India ,Healthy India) स्वच्छ भारत , निरोगी भारत या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे 1 ते 31 ऑक्टोबर 2021 या काळात हा कार्यक्रम उमरेड तहसील मधील गावागावात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या मध्ये प्लास्टिक संकलन करण्यात येणार आहे . प्लास्टिक चा वापर कमीतकमी करावा असा संदेश देण्यात येत आहे .

उमरेड तहसील कार्यालयाच्या प्रागणात स्थित महात्मा गांधी जी यांच्या प्रतिमेला तहसीलदार श्री संदीप पुडेंकर , नायब तहसीलदार प्रदीप वरपे , मोनिष अठ्ठरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना नमन करण्यात आले .

तहसील कार्यालय परिसर व बस स्थानक परिसरात स्वछता अभियान राबवून मान्यवरांच्या हस्ते स्वच्छ भारत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला व यातून एकूण 35 किलो प्लास्टिक संकलन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीत नेहरू युवा केंद नागपूर चे स्वयंसेवक प्रतीक अठ्ठरकर , अभिजित सवाईमुल तहसील चे कर्मचारी पराग ईखारखर , राकेश पोटवार , त्र्यंबक वोलादी , अक्षय उताणे अभिषेक करमोरे , सी पी साटकर सहित श्रावण नान्हे ,ऋषी ठाकूर परिषम घेत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies