प्राचार्यांनी दिली पीडित प्राध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी
चंद्रपूर, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून सुरू करण्यात आलेले बल्लारपूर इन्स्टट्यूट ऑफ टेकनोलॉजी, बल्लारपूर (बीआयटी) सद्या चांगलेच चर्चेत आहे. येथील एका महिला कर्मचारीने 2 प्रचार्यांविरुद्ध विनयभंग केल्या प्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याने, शैक्षणिक वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरला आहे. मायनिंग इंजिनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार प्राचार्य श्रीकांत गोजे व प्राचार्य रजनीकांत मिश्रा यांनी 6 ऑक्टोबर ला अभद्र व्यवहार करीत प्राध्यापिकेचा लॅपटॉप फोडण्याचा प्रयत्न केला. याच वेळी या दोघांनी हात पकडून ओढाताण केली. यात प्राध्यापिकेच्या हाताला जखम झाली व तिचे कपडे फाडले गेले. घाबरलेल्या जयश्रीने बाहेर निघून संस्था चालकांना सूचना केली पण ते बैठकीत व्यस्त होते. जयश्रीने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले, तक्रार केली पण त्याची दखल घेतली नाही. पोलिसांनी दोन्ही प्रचार्यांना चौकशी करिता बोलावले. पण नंतर पोलीस चहा पाण्यात रमले. जयश्री मागील 6 वर्षांपासून कार्यरत आहे. तेथे काम करणारा शैलेश हा देखील जयश्रीच्या पाळतीवर असतो व जयश्रीने प्रचार्यांसोबत दुष्कृत्य करावे, यासाठी तो प्रयत्नशील असतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा सारथी असोसिएशनचा कारनामा: संजय वासाडे
मागील काही महिन्यांपासून येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सारथी असोसिएशन व्यवस्थापनाविरुध्द चुकीच्या तक्रारी करीत आहे. त्यांचा उद्देश पूर्ण होत नसल्याने त्यांनी हे कथित प्रकरण घडवून आणले. मुळात ही घटना इंटरनेटच्या जोडणीबाबत आरोप प्रत्यारोप करण्यावरून घडली. त्यावेळी प्राचार्यांनी जयश्रीला इतर लोकांसमोर सुनावले. त्यामुळे ती अपमानीत झाली. याघटनेची तक्रार व्यवस्थापनाकडे जयश्रीने दिल्यानंतर तिने आणखी एक तक्रार पोलिसांना दिली. पण या दोन्ही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले विषय कुठेही जुळत नाही. हे संपूर्ण प्रकरण सारथी असोसिएशनने घडवून आणले आहे. त्यामुळे त्यात तथ्य नाही, असे बीआयटीचे संचालक संजय वासाडे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्याच्या व विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत आहे म्हणून संजय वासाडे असोसिएशन ला बदनाम करत आहे :- अध्यक्ष- देवेंद्र सायसे सारती असोसिएशन महाराष्ट्र राज्य,चंद्रपूर ही संस्था महाराष्ट्र भर शिक्षण क्षेत्रात भ्रष्ट शिक्षण व्यवस्थापणा विरोधात प्रामाणिक पने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व पालक याना न्याय हक्कासाठी लढा देत आहे व चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे तसेच बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि बामणी बल्लारपूर या संस्थेशी कर्मचाऱ्याच्या व विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा सातत्याने देत आहे त्याच्या मुळे बी.आय. टी. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. संजय वासाडे आमच्या असोसिएशन ला बदनाम करत आहे ह्या पीडित प्राध्यापिकी ला आम्ही कुठलेही भडकवाचे काम केले नाही तिच्यावर अन्याय झाला म्हणून ती पुढे आली जे सत्यता असेल ती बाहेर येणारच घटना काय झाली हे आम्हाला सुद्धा माहिती नाही पीडित प्राध्यापिका व प्राचार्य यांनाच माहीत पण सकोल चौकशी व्हावी व कुठलाही राजकीय दबाव नको अशी आमच्या असोसिएशन ची मागणी आहे B I T च्या अनेक भ्रष्टाचारा बाबत आम्ही पुराव्यानिशी लढत आहे हे जनतेला व पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती आहे भल्या भल्या ना आमच्या असोसीएशन ची धास्ती बसलेली आहे भीती आम्हाला कुठलेही नाही चोरी करणार्यांना आमच्या असोसीएशन ची भीती आहे अध्यक्ष- देवेंद्र सायसे,सारती असोसीएशन महाराष्ट्र राज्य,चंद्रपूर
बीआयटीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा यांनी दिली पीडित प्राध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी
जयश्रीच्या तक्रारीनुसार तिला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी प्राचार्यांांनी दिली. हेच नाही तर बिहार व झारखंड येथील विद्यार्थ्यांना देशी कट्टा, पिस्तूल पण आणावयास सांगितले. यासाठी जयश्रीने अश्या विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर द्यावे असेही ही प्रयत्न केले असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.