धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता आम्ही गमावला : आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुरचे माज़ी नगराध्यक्ष , ज्येष्ठ नेते गयाचरणजी त्रिवेदी यांच्या निधनाने चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता आम्ही गमावल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपुरचे नगराध्यक्ष म्हणून धुन्नू महाराज यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. विकासप्रक्रियेत त्यांनी कधीही राजकारण केले नाही. त्यांच्या निधनाने चंद्रपुरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे असेही आ. मुनगंटीवार यांनी शोकसन्देशात म्हटले आहे.
धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला : खासदार बाळू धानोरकर
नगराध्यक्षपदाच्या काळात धुन्नू महाराज यांनी चंद्रपुरात भव्य वास्तू उभ्या केल्या. प्रशासनावर त्यांची पकड होती. त्यांच्या निधनाने धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!
शिस्तप्रिय, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमचे हरपले - आ. किशोर जोरगेवार
धन्नू महाराज यांनी नगराध्यक्ष असतांना आपल्या शिस्तीने प्रशासनावर अंकुश ठेवत चंद्रपूरात अनेक असाधारण गोष्टी सहज शक्य करून दाखविल्यात त्यांच्याच कार्यकाळात चंद्रपुरची प्रमुख ओळख असलेली सात मंजली इमारत उभी राहिली. आज त्यांच्या जाण्याने चंद्रपूरकरांनी एक शिस्तप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमच गमावलं असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी धन्नू महाराज त्रिवेदी यांच्या निधनानंतर दिलेल्या शोकसंदेशात मटले आहे.
धन्नू महाराज हे यशस्वी राजकारण्यासह उत्तम व्यवसायिकही होते. त्यांचे अनेक राजकीय पक्षातील लोकांशी चांगले संबध होते. आमदार झाल्यानंतर चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मला अनेकदा अनेक सूचना केल्यात त्यातून चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जणवायची. मी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. ते नगराध्यक्ष असतांना मनपा प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे दर्जेदार असायची. आज त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.