नुकतेच आपल्या भारत देशाने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 100 कोटी लसीकरणाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठा वाटा हा लसीकरण करणारे कर्मचाऱ्यांचा आहे.
म्हणूनच महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समीतीचे अध्यक्ष आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार व भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या निर्देशानुसार, भारतीय जनता पार्टी बंगाली समाज आघाडी ने जिल्हाध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर स्थित शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोवीड लसीकरण केंद्रास भेट दिली व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री वाडे, डॉ सोहा अली व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले व आभार व्यक्त केले,
याप्रसंगी भाजपा महानगर बंगाली समाज आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य, उपाध्यक्ष डॉ नितीन बिश्वास, बिमल शहा, सचीव सपन सरकार, अविनाश घरामी, सुबीर समाद्दार, सुब्रतो बिश्वास दिपंकर दास यांची उपस्थिती होती.