देणघेणीतून बल्लारपूर पोलिसांनी तक्रारचं दाखल केली नाही ?
बल्लारपुर :- शहरातील बामनी येथील बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (BIT) कॉलेज येथे एका प्राध्यापिकेचा मानसिक छळ याच कॉलेजतील प्राचार्य श्रीकांत गोजे व अभियांत्रिकी विभागाचे रजनीकांत मिश्रा यांचेकडून सूरु आहे, याविरोधात ६ आॅक्टोंबर रोजी बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये पिडीत प्राध्यापिका गेली असता, त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. प्राचार्यांकडून आपला मानसिक छळ केला जात असल्याची माहिती पिडीताकडून बिआयटी व्यवस्थापनाला देण्यात आली असून आता व्यवस्थापन स्वतः: हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पिडीत प्राध्यापिकीने केला आहे. बिआयटी चे प्राध्यापक व त्यांचे सहकारी पिडीतेच्या शरीरावर टिप्पणी करणे, त्यांच्या अंगावरील कपड्यावर टिप्पणी करणे यासारखे घाणेरडे व लज्जास्पद प्रकार करीत असतांना सुद्धा महिलेच्या सुरक्षेवर कल्पना असून ही व्यवस्थापन गंभीर नाही, प्रकरणाला दाबण्याचा व एका सुशिक्षित महिलेवर दबाव आणण्याचा व्यवस्थापनाकडून सूरू असलेला प्रयत्न हा लांच्छनास्पद आहे, याविरोधात महिला आयोगाकडे दाद मागितली असून आपल्याला न्याय मिळावा, यासाठी वाट्टेल ती लढाई लढण्यासाठी आपण तय्यार असल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे.
तक्रार द्यायला गेलेल्या पीडितेला पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवण्यात आले ज्यांच्या विरोधात तक्रार आहे तेसुद्धा त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते असा आरोप पीडितेने या वेळी केला आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराचे अनेक प्रकार आता समोर येत आहेत त्या नंतर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एखाद्या सुशिक्षित प्राध्यापिकेचे संदर्भात असे प्रकरण होत असेल तर ही बाब अत्यंत भयावह आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साडे साहेब यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सदर प्रकरणाची दखल घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा अन्यथा या विरोधात मोठे आंदोलन पुकारले जाईल, अशी माहिती सदर प्रतिनिधी ला सारती असोसिएशन संघटनेने दिली.