महात्मा फुले चौक ते बुरुज पर्यंत मोठ्या नाल्याचे भूमिपूजन
चंद्रपूर :- मागील चार वर्षाच्या कार्यकाळात महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर नगरीच्या विकासाकरीता मोठ्या प्रमाणात विशेष निधीची उपलब्धता झाली. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात अनेक विकास कामांची मालिका शहरासाठी राबविण्यात आली. यापुढेही जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या स्वच्छ व सुंदर चंद्रपूरचा विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी प्रणित चंद्रपूर महानगरपालिका विशेष निधी अंतर्गत मंजूर केलेल्या नगीनबाग प्रभागात क्रमांक 9 मधील महात्मा फुले चौक ते बुरुज पर्यंत बांधकामाचे भूमिपूजन उपमहापौर रहुल पावडे यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर रोजी सिस्टर कॉलनी चौक येथे करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नगीनाबाग प्रभागात अनेक विकास कामे सुरू असून नगीनाबाग प्रभागाला विकासकामाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणार, असा विश्वास यावेळी उपमहापौर राहुल पावडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेवक बंटी चौधरी, सविताताई कांबळे, वंदनाताई तिखे व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, भाजपा कार्यकर्ते सुनील डोंगरे, रवी जोगी, महेश राऊत, लोणकर, अमोल मत्ते, पियुष लाकडे, संजय निखारे, अक्षय शेंडे अमित गोरकार आदी सह वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.