चंद्रपूर :- सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे अन्यायाला वाचा फोडणारे खुशाल युवा नेतृत्व सत्यम गाणार यांची माळी महासंघ युवा आघाळीचा चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्त माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री अरुण जी तिखे व जिल्हा अध्यक्ष श्री विजय जी चहारे ,विजय भाऊ राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी निलेश खरबडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , रवी गुरनुले जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रपूर, श्री विशाल निंबाळकर अध्यक्ष युवक आघाडी जिल्हा चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यम गाणार नेहमीच चंद्रपूर शहरतील समाज बांधवांच्या कुठल्या ही कार्यात अग्रेसर रहातात, शिवाय कुणालाही न्याय देण्यासाठी त्याची धडपड पहाता वरिष्ठांनी हि महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली सत्यम गाणार यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे समाज बांधव, मित्रपरिवार स्नेही कडुन सर्वत्र अभिनंदन होत आहे