Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

इरई नदी काठावरचा गावांना व चंद्रपुर शहरतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनचंद्रपूर :- हवामान खात्याने 'शाईन वादळाची शक्यता वर्तवली असून जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

त्यामुळे नजीकच्या काळात चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील आजची पाण्याची पातळी २०७२२५ मी. वरुन वाढून ऑक्टोबर महिन्याची कमाल पातळी केव्हाही गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार, इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागू शकतात.

त्यामुळे पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचौडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपुर, माना आणि इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वतः नदीच्या पात्रापासून दूर राहावे तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जिवीत किंवा वित्त हानीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही.

तसेच, इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात येतील. असे आव्हान महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies