Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अखेर चंद्रपूरच्या गणेश गुप्ताचा 22 लाखांच्या सुगंधित तंबाखू सहीत डुग्गीपार पोलिसांनी केली एकाला अटक!


चंद्रपूर (वि.प्रति.) सोमवार दिनांक 26/10/2021 रोजी गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीसांनी मोठी कारवाई सुगंधी तंबाकु, ट्रक सहीत 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल जप्त केला. यामध्ये चंद्रपूरचा गणेश गुप्ताचा मुद्देमालासहीत नागपूरचा शाहरुख नासिर खान (27) याला अटक केली असून ही कारवाई गोंदिया चे पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, सहा. पोलीस अधिक्षक गोंदियाअशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, रायपुर वरुन नवेगावबांध कडे निघालेल्या एका ट्रकमध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधी तंबाकुची वाहतुक होत असल्याची माहीती दि. 26/10/2021 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन वांगडे यांना मुखबीर कडुन मिळाली त्या माहीतीच्या आधारे डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी सहकारी पोलीस अमलंदारा सोबत नवेगाव टी पांईट कोहमारा चौक नाकाबंदी करुन सदर ट्रकची तपासणी सुरु केली असता ट्रक क्र.एम.एच. 40 बि.जी - 3444 त्यामध्ये 1) 27 बॉक्स ज्यामध्ये सुगंधीत तंबाकु (मजा 108) चे 500 ग्रमचे 538 बॉक्स किं. 10,25,670/- 2) 10 प्लास्टिक पोती ज्यामध्ये सुगन्धित तंबाकु (ईगल) चे 400 ग्रॅमचे 400 पॅकेट एकुण कि. 2,16000/- रुपये व ट्रक अंदाजे कि.10,00000/- असा एकुण किंमती 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल पो.स्टे.ला जमा करुन ट्रकमधील प्रतिबंधीत सुगन्धित तंबाकु बाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे कळविण्यात आले त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी 1) शाहरुख नासिर खान वय 27 वर्षे रा. नागपुर 2) गणेश गुप्ता रा.चंद्रपुर यांचे विरुदध अप. क्र. 280 /2021 कलम 188, 272, 273, 328 भादवी सहकलम 3,26 (2)(i), 26 (2) (iv) ,27 (2) (e) ,30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे.सदर कारवाई मा.श्री विश्व पानसरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया , मा.श्री अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies