Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

शहरातील बस स्थानक परिसरात युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू




चंद्रपूर बस स्थानक परिसरातील महसुल भवनाच्या छतावर केबलचे काम करत असलेल्या 22 वर्षीय युवकाचा विज पडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.


शहरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरू होता. त्याचवेळी मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन वरती मुले केबल टाकण्याचे काम करीत होते. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि केबल टाकणाऱ्या अनिकेत नामक युवकाचा अंगावरती वीज पडली. अंगावर वीज पडल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. मृतक युवकाचे पूर्ण नाव अनिकेत चांदेकर (वय 22) असून तो नागभीड येथे राहणारा आहे.अनिकेत सद्या चंद्रपुरातील बाबूपेठ येथे जुनोना चौक भाड्याने राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात केबल टाकण्याचे काम करीत होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies