Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गुरुवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 2 बाधित



ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 19

चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली आहे.त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे .

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर येथे 2 रुग्ण आढळले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना ,जिवती व इतर ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 793 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 232 झाली आहे. सध्या 19 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 23 हजार 7 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 32 हजार 921 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन :नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies