Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

केंद्रिय कोळसा व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लवकरचं चंद्रपूर जिल्हयाचा दौरा




(घुग्घुस प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा अध्यक्ष, विधिमंडळ लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार केंद्रीय कोळसा व रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे हे चंद्रपूर जिल्हयाच्या दौऱ्यावर लवकरच येत आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

या दौऱ्यात ते चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाणीच्या परिसरातील नागरिकांच्या तथा कामगारांच्या विविध समस्या, व तक्रारी जाणुन घेणार आहेत. रेल्वे संबंधी समस्या व तक्रारीसुद्धा यावेळी समजून घेऊन निराकरण करण्यात येणार आहेत.

करिता आपल्या क्षेत्रातील कोळसा खाणीसंदर्भात किंवा रेल्वेसंदर्भात काही तक्रारी किंवा समस्या असल्यास या दौऱ्याचे संयोजक भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या वॉटसअॅप क्रमांक ९८२२२९९०११ वर ५ ऑक्टोबर पर्यंत पाठवा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies