प्रोजेक्ट मॅनेजर वासाडे यांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
भद्रावती :- बरांजस्थित कर्नाटक एम्टा कोळसा खाण ही ३१ मार्च २०१५ पासून बंद झाली होती. आता गेल्या वर्षभरापासून खान सुरू करण्यात आली आहे. या खाणी मध्ये प्रकल्पग्रस्त कामगार गेल्या आठ महिन्यांपासून मासिक पगारा बिना काम करीत आहे. असे असून भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत कोळसा खाणीच्या प्रोजेक्ट मॅनेजरने पेट्रोलिंगच्या नावाखाली काही गार्ड ठेकेदारी पद्धतीने कामावर घेतले आहे. मात्र हे गार्ड व प्रोजेक्ट मॅनेजर प्रकल्पग्रस्त कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहे. 27 सप्टेंबरला बरांज येथील गाडगे नामक कामगाराला प्रोजेक्ट मॅनेजरने ठेवलेल्या गार्डने शुल्लक करणावरुन बेदम मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर 28 तारखेला संपूर्ण कामगारांनी प्रोजेक्ट मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले व भद्रावती पोलीस स्टेशनला घेराव घातला काही वेळा साठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनीचा ठेकेदार गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे. कर्नाटक एम्टा या कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या अद्यापही समस्या मार्गी लावल्या नाहीत आणि गुंड प्रवृत्तीच्या गार्ड कडून कामगारांना मारहाण केली असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.