नगाजी गनफाडे ,युवासेना शहर चिटनिस यांची आयुक्तांना मागणी
चंद्रपुर :- शहरामध्ये येत्या काही दिवसांपासून मोकाट जनावरे मोठया प्रमाणात रस्त्यांवर दिसुन येत आहे. पहिलेच प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे संपूर्ण महानगर खड्डेमय झालेले दिसुन येत आहे. जागोजागी खड्डे व त्यात पावसामुळे जमा सांडपाणी त्यामुळे पूर्ण रस्त्यांची दुर्दशा होत असून त्यात भर की काय म्हणुन मोकाट मुक्या जनावरांमुळे रस्त्यांवरून जातांना नागरीकांना त्रास सहन करावे लागत असून अपघाताचे प्रमाण पुन्हा वाढत असुन यावर उपाययोजना करून महानगर प्रशासनांनी लोकांची जिवीत हानी होण्यापासून वाचवावे हि विनंती आज या निवेदनाद्वारे युवा सेना चंद्रपूर शहरच्या वती शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी गिर्हे,शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटीलजी,युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेशजी बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,शहर चिटनीस नगाजी गनफाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले .
यावेळी युवासेना शिष्टमंडळात उपजिल्हा प्रमुख अनिरूध्द तपासे, शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, शहर समन्वयक करन वैरागडे, नंदू अराडे व युवासेैनिक यांची उपस्थिती होती