Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बसच्या समोर बसून विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन
◼️दोन तास वाहतूक ठप्प

◼️वेळेत बस येत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत

◼️बस फेऱ्या वाढविण्याची मागणी

नेरी :- गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा कॉलेज बंद आहेत मात्र गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या नियमाचे पालन करून काही शाळा कॉलेज सुरू करण्यात आले आहे. मात्र चिमुर सिंदेवाही मार्गावर बस फेर्या कमी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बससाठी दोन दोन तास तात्कळत राहावे लागत असून बस आली तर तीही प्रवाशाने भरून येत असल्याने काही दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज मध्ये जण्यापासून मुकावे लागत असल्याने अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यानी चिमुर आगाराच्या बस समोर बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मोटेगाव पेंढरी येथील विद्यार्थ्यांना चिमुर व सिंदेवाही या शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते मात्र या मार्गाने बस फेर्या कमी असल्याने दररोज महामंडळची बस एक तास तर कधी अर्धा तास ऊशीरा यायची.नियमीत वेळेवर आली तर प्रवाशी भरुन यायची त्यामुळे एका गावचे विद्यार्थी जायचे तर दुसर्या गावच्या विद्यार्थिना बसमध्ये जागा न मिळाल्याने त्यांना नाईलाजास्तव घरीच राहाव लागत असे दररोज चिमूर सिन्देवाही येथे जाणाऱ्या गावखेड्यातील विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.


मोटेगाव पेंढरी येथील संतापलेल्या विद्यार्थानी आज दि. २८ सप्टेंबर रोजी पेंढरी (कोके) येथे ११ वाजताच्या दरम्यान चिमुर सिंदेवाही महामंडळ च्या बस पुढे अचानक सर्व विद्यार्थी बसल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती व पाच ते सहा बसेस रोखून ठेवण्यात आल्या. ही घटना सिंदेवाही पोलीसांना माहिती होताच पोलिस उपनिरीक्षक नेरकर हे आपली टीम घेऊन पोहचले. विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आगार प्रमुख चिनूर यांना दुरध्वनी द्वारे माहिती दिली. एक तासानंतर आगार प्रमुख शेख व त्यांचे सहकारी हे पेंढरी येथे पोहचुन विद्यार्थ्यांसोबत पोलीसांच्या मध्यस्थीने तुमच्या मागण्या पूर्ण होईल व उद्यापासून नियमीत तुमच्या वेळेवर एसटी बस येईल असे तोंडी आश्वासन दिले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आगार प्रमुख यांना निवेदन दिले. त्यानंतर आंदोलन हे स्थगित करून रोकलेली वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. यानंतर आगार प्रमुख शेख यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. यापुढे विद्यार्थीसाठी नियमीत बस येईल का? याकडे विद्यार्थी व गावकर्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies