Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ऑनलाईन ई-पीक नोंदणीकरिता चालू आहे रुपेशची धडपडकोरपना: शेतकऱ्यांच्या जमिनीवर लावलेल्या पिकाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने शेतात जाऊन स्मार्टफोनच्या आधाराने शेतकऱ्यांनीच करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे. दररोज हवामानात बदल होत आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आज अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर कीड व रोग तसेच कापुस या पिकावर गुलाबी बोंड अळी हा रोग पडला आहे, जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांची नासधूस झाली आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. काही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आहेत पण त्यांना हाताळण्याचे ज्ञान नाही, ग्रामीण भागात जास्त इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे कधी मोबाईलमध्ये कव्हरेज राहत नाही, मग ऑनलाईन ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करावी तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. या आदेशाने ग्रामीण शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. या समस्येची बाब लक्षात घेता युवा सामाजिक कार्यकर्ते, शेरज (बु) रुपेश दुधकर यांनी आपल्या स्वगावात शेतकऱ्यांना मोफत ई-पीक पाहणी नोंदणी करून देण्याचे ठरविले आहे. चार-पाच दिवसापासून गावातील शेतकऱ्यांच्या शिवारात स्वतः भेट देऊन ई-पीक पाहणी नोंदणी करून देत आहे. विनोद बावणे ,मधुकर गौरकर, रामदास बोन्डे, बाबाराव साखरकर,श्रीराम बोबडे, हरी बोन्डे ,रविंद्र आगलावे, सोमेश्वर भांदेकर,नामदेव साखरकर, रामचंद्र भांदेकर,रविंद्र भांदेकर,विलास साखरकर आदी शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदणी करून दिली आहे. यासाठी अस्मिता बोन्डे या युवतीचे रूपेश ला मोलाचे सहकार्य लाभले आहे. आणि ई-पीक पाहणी नोंदणी करीता गावातील शेतकऱ्यांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies