Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पोलिस भरती परिक्षा एस.आर.पी.एफ



हॉल तिकीट संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी - आ. सुधीर मुनगंटीवार

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन सादर

पोलिस भरती परिक्षा एस.आर.पी.एफ. चे हॉल तिकीट संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.(Police Recruitment Examination SRPF)



चंद्रपूर मनपा सदस्य सचिन भोयर यांनी या विषयाकडे आ. मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आ. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की दिनांक ९ सप्‍टेंबर २०२१ रोजी एस.आर.पी.एफ. पोलीस भरतीची परिक्षा होणार आहे. सदर परिक्षेचे काम जिजर या कंपनीकडे देण्‍यात आलेले आहे. सदर कंपनीद्वारे अधिवास प्रमाणपत्र अपडेट करण्‍याबाबत कोणतीही पूर्व सुचना देण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे काही मोजक्‍याच मुलांनी अधिवास प्रमाणपत्र अपडेट केले आहे. त्‍यामुळे केवळ या मुलांचेच परिक्षा प्रवेशपत्र संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत आहे. या परिक्षेमध्‍ये राज्‍यातील २७ हजार उमेदवार परिक्षा देणार आहे. परिक्षेकरिता बसलेल्‍या उर्वरित उमेदवारांना अधिकृत संकेत स्‍थळावर उपरोक्‍त तांत्रीक अडचणीमुळे प्रवेशपत्र उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरलेला असून परिक्षेपासून वंचित राहावे लागणार असल्‍याची भिती निर्माण झाली आहे. सदर परिक्षेकरिता फक्‍त ७ दिवसाचा कालावधी शिल्‍लक आहे. त्‍यामुळे उक्‍त परिक्षेला बसलेल्‍या उमेदवारांनी पोलीस भरती परिक्षा एस.आर.पी.एफ. चे हॉल तिकीट संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ मिळण्‍याची विनंती केली आहे. शासनाने उमेदवारांचे हित लक्षात घेता अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय त्वरित जाहीर करावा अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies