चक्क खड्डयात पोहून वेधले प्रशासनाचे लक्ष
खांबाडा, नागरी, माढेली मार्ग ठरतोय जीवघेणा
वरोरा :- तालुक्यातील एकोना कोलमाईन्स नव्यानेच सुरू झाली आहे. या माईन्स मधून निघणाऱ्या कोळशाची वाहतुक खांबाडा, नागरी, माढेली या मार्गाने दररोज शेकडो हायवा ट्रक ने होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोळश्याची वाहतूक होत असल्याने या मार्गाची वाट लागली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून जणुकाही स्विमिंग पूल तयार झाले आहे. या खड्ड्यात वरोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज तेलंग यांनी चक्क लोटांगण घालीत पोहण्याचा प्रयत्न करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नागरी-बारव्हा मुरदगाव, वडगाव, खांबाडा या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोळश्याची वाहतूक हायवा ट्रक ने केली जात आहे. याची दखल घेत खासदार बाळू धानोरकर यांनी जीएमआर, वर्धा पावर व एकोना कोल माइन्स या कंपनीच्या अधिकाऱ्यांना तंबी देऊन जड वाहतूक बंद केली आहे. या रोडचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश ही या कंपन्यांना देण्यात आले असतांनाही या रस्त्याकडे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या मार्गावर पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात वरोन्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज तेलंग यांनी पोहण्याचा प्रयत्न करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.