Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा सरकारविध्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:-प्रतीक बारसागडे जिल्हा महामंत्री भारतीय जनता विध्यार्थी मोर्चा
महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर शहरात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात युवा मोर्चा कडून आंदोलन घेण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले ज्यामध्ये नगरपालिका चौकामध्ये युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आले त्यानंतर पायदळ मोर्चा काढून तहसील कार्यालयामध्ये युवा मोर्चा व भाजयुमो विद्यार्थी आघाडी च्या माध्यमातून श्री.राईंचवार साहेब तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागाच्या गट क व ड च्या रिक्त जागेसाठी परीक्षा जाहीर केल्या होत्या परंतु आरोग्य विभागाच्या क व ड गटातील परीक्षा रद्द करण्यात आल्या,आरोग्य विभागाच्या परीक्षा राज्य सरकारने परीक्षेला काही तास शिल्लक असताना रद्द केल्या, हे अतिशय बेजबाबदार पणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ या सरकारने करून ठेवला आहे.आरोग्य मंत्र्यांच्या एका साध्या मीडिया बाईटच्या माध्यमातून फक्त दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपणार नाही.
गोरगरीब विद्यार्थी कोणाकडून उसने पैसे घेऊन, काही तरी व्यवस्था लावून परीक्षा केंद्र ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांची नुकसान भरपाई कोण देणार?त्यांच्या परीक्षांची तारीख सरकारने पुढच्या चार दिवसांत जाहीर करावी! आणि अशा बेजबाबदार मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता विध्यार्थी मोर्चाचे जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागडे यांनी तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना केलेली आहे. प्रसंगी भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, ट्रान्सपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा,भाजयुमो जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर,सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, सुजित निर्मल,मनीष रामीला,मोहित डंगोरे,श्रीकांत उपाध्याय,अशोक सोनकर, रिंकू गुप्ता,प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी,शुभम बहुरिया, राजू निषाद,श्रवण मोगरम,आकाश ननावरे, अविनाश आधे, कधीर भाई,कौसर भाई तसेच अनेक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन संपन्न झाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies