राजूरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी युवतींना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी
चंद्रपूर :- जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांना एका तरुणाने थेट मुलगी पटत नाही म्हणून पत्र लिहिले पत्रामध्ये माझ्यावर घोर अन्याय होत असून मला मुली पटत नाही, भाव देत नाही हे असह्य होत आहे, असे म्हणत एका तरुणाने थेट आमदारांना पत्र लिहिले आहे. या तरुणाने आमदारांनाच पुढाकार घेऊन काहीतरी करावे अशी मागणी केली आहे.तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.(The letter of the youth directly to the MLAs as the girls do not agree, do not pay the price )
चंद्रपूर येथील तरुण भूषण जामुवंत राठोड नावाच्या तरुणाने राजूरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांना एक पत्र लिहिले आहे. संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नसल्याने चिंतेची बाब आहे, असे म्हटले आहे. तसेच यामुळे माझा आत्मविश्वास खचला असल्याचेही त्याने म्हटले.
मी खेड्यापाड्यातील रहिवासी असून राजुरा-गडचांदूर येथे येत असतो. परंतु मला मुली भाव देत नाहीत. पटत नाहीत. दारु पिणाऱ्याला गर्लफ्रेंड असते, हे बघून माझा जीव जळून राख होतो. आमदारांनी विधानसभा क्षेत्रातील युवतींना प्रोत्साहन द्यावे आणि आमच्यासारख्यांना भाव देण्यास सांगावे, अशी मागणी या तरुणाने या पत्रात केली.