शेतकऱ्य़ांचे लाखो रुपयांचे नुकसान
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 66 मिमी एवढा पाऊस पडल्याने कापणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात भात, कापूस आणि सोयाबीन ही तीन प्रमुख पिके घेतली जातात.यात सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. भात आणि कापूस सुरक्षित आहे. गेल्या दोन दिवसांत 66 मिमी एवढा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सोयाबीन लागवड असलेल्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन हातून जाण्याची वेळ शेतकाऱ्यांवर आली आहे. सोयाबीनच्या शेंगा आता पूर्णपणे विकसित झाल्या होत्या आणि काही दिवसात त्या तोडल्या जाणार होत्या. पण त्यापूर्वीच पावसाचं जोरदार आगमन झाल्याने पीक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादन संकटात सापडला आहे.(Heavy rains hit soybean crop)
या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी कृषी विभागाने पीक विम्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ज्यांचे सोयाबीन सुस्थितीत आहे, त्यांनी लगेच ते सुस्थळी ठेवण्याचे करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.