Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

देशी कट्टा बाळगणाऱ्या किराणा दुकान मालकास अटकएक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पांच जिवंत काडतुसे मिळून आली

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली अनुसार दिनांक.(Grocery shop owner arrested) 29/8 /2021 ला लखमापूर छत्तीसगढी मोहल्ला चंद्रपूर येथील रुकधन किराणा दुकान मालक नामे रुकधन परसराम साहु याने त्यांचे घरी देशी बनावटीची अग्निशस्त्र घेऊन लपवुन ठेवले आहे. अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी तत्काळ ठिकाणी रवाना झाले मिळालेली माहिती अनुसार रुकधन किराणा दुकान येथे पोहोचून त्याचे दुकानात मालक रुकधन परसराम साहु वय 52 वर्ष रा. लखमापूर वार्ड क्रमांक. 3 चे छत्तीसगढ झोपडपट्टी, चंद्रपूर यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घरझडतेमध्ये एक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळून आली.#MH-34UPDATENEWS

त्यांचे अंदाजित किंमत ( 10,000 ) दहा हजार रुपये आहे मिळालेली देशी पिस्तल पांचा जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविन्द साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोकडे, पो.उप. नि. संदीप कापडे, पो. हवा. संजय आतकुलवार, पो. शि. गोपाल आतकुलवार, पो. शि. नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बवरी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies