चंद्रपूर:- जिल्ह्यातील प्रवाशांना गोव्याला जाण्यासाठी मुंबईचा लांब आणि महागडा प्रवास करावा लागणार नाही. रेल्वे मंत्रालयाने गोवा वास्को द गामा पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशांना व बल्लारशाहला विशेष ट्रेन चालवून भेट दिली आहे. 06398 जस्सीदिद-गोंदिया-वास्को दा गामा ट्रेनचे आज बल्लारशाह स्टेशन येथे आगमन झाल्यावर अजय दुबे ZRUCC सदस्य मध्य रेल्वे मुंबई, श्रीकांत उपाध्याय, प्रभुदास तंद्रा, मौला निषाद इत्यादीने लोको पायलट ई. संपत आणि सूरज कुमार यांना पुष्पगुच्छ देहुन स्वागत केले आणि सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
ही ट्रेन आठवड्यातून एकदा गोवा स्पेशल ट्रेन जस्सीद जंक्शन झारखंड येथून सुरू होईल आणि वास्को दा गामा गोवा राउरकेला, बिलासपूर, रायपूर, गोंदिया, बल्लारशाह, मांचिरियाल, काजीपेट, सिकंदराबाद, रायचूर इत्यादी स्थानकांवर पोहोचेल.