Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

शेतक-यांनो जिल्हा बँक आपल्या पाठीशी आहे : रवि शिंदे- भद्रावती तालुक्यातील भटाळी व धानोली येथील शेतक-याला आर्थीक सहकार्य

- बैल मेल्याने शेतक-याला मदत

- वरोरा व भद्रावती तालुक्यातील गावागावात फिरुन शेतक-यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांना सहकार्य करणे, रवि शिंदे यांचा उपक्रम

(भद्रावती : प्रतिनिधी)
शेतक-यांनो जिल्हा बँक आपल्या पाठीशी आहे, आपल्यावर ज्या-ज्या वेळेस आपत्ती येणार आपण बँकेला हाक दया, जिल्हा बँक आपल्या दारी असेल, असे प्रतिपादन दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी केले.

दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 'शेतकरी कल्याण निधी' या योजने अंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून भटाळी व धानोली येथील शेतक-याला दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश वितरीत करुन आर्थीक सहकार्य करण्यात आले. या शेतक-यांचे बैल मेल्याने त्यांना हे सहकार्य करण्यात आली.

दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या भद्रावती तालुक्यातील भटाळी व धानोली शाखेने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. भटाळी येथील शेतकरी शालिक दसरु तुराळे यांचा बैल विद्युत करंट लागल्याने मृत झाला तथा धानोली येथील सुरेश गोसाई माडेकर यांचाही बैल मृत झाला, त्यामुळे (दि.23) रोजी प्रत्यक्ष गावात जावून त्यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आर्थीक सहकार्य देण्यात आले.

रवि शिंदे प्रत्यक्ष वरोरा व भद्रावती तालुक्यातील गावागावात फिरुन शेतक-यांवर ओढवणा-या समस्यांना जाणून घेत आहेत व त्यांना बँकेतर्फे तथा स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे जी मदत करण्यात येइल, ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.

याप्रसंगी उपसरपंच मंगेश भोयर, सरपंच छायाताई खापने, माजी सरपंच सुधाकर रोहणकर, विलास सातपुते, प्रशांत तुरारे, भाऊराव सातपुते, गोकुल रोडे,योगीराज निखाड़े, दिलीप तुरारे, पुरुषोत्तम तुरारे, रमेश ताजने, दादाजी नन्नावरे, दौलत काकडे, निळकंठ विधाते, सुर्यभान सातपुते, रुधा देरकर, धनराज रोडे, सुभाष सपाट, संतोष माडेकर, महादेव काळे, उमेश पाटील, रामचंद्र रोडे, मधूकर रोडे, देवराव खापने, गणपत मडावी, माया विधाते, चंद्रकांत विधाते, सुदाम चिडे, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना रवि शिंदे यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies