Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वैद्यकीय महाविद्यालयातील लिपिकास पन्नास हजारांची लाच घेताना अटक
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच आज वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक लिपिकास रंगेहाथ अटक करण्यात आली. शेख सलीम शेख मौलाना असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे.

सिंदेवाही येथील तक्रारदाराने वडिलाच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्या प्रमाणपत्रावर वैद्यकीय मंडळाच्या अध्यक्षाची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी लिपिक शेख सलीम शेख मौलाना यांनी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकरर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

प्राप्त तक्रारीनुसार २२ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत ५० हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मंगळवारी (ता. २८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. त्यावेळी लिपिकी शेख सलीम शेख मौलाना यांना पन्नास हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे, पोलिस निरिक्षक शिल्पा भरडे, रमेश दुपारे, मनोहर एकोणकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, रोशन चांदेकर यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies