कुणबीसेने मध्ये मोठे फेरबदल करून पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने येत्या काही दिवसात महाराष्ट्र प्रदेश व सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या होणार आहेत.
कुणबीसेनेत तरुणांना आणि महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या जागी सक्षम पदाधिकारी देण्या साठी मोठे फेरबदल होणे ही काळाची गरज आहे. येत्या काही दिवसात युवादल, भगिनीदल व वारकरी दलाच्या नियुक्त्या करणार असल्याचे कुणबी सेना प्रमुख श्री. विश्वनाथ पाटील यांनी जाहीर केले आहे.
पालघर जिल्ह्यातील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या जागी सक्षम व खम्बीर नेतृत्व देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त करण्यात आली असून ,एक सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुका जाहीर झाल्याने निवडणुकी संदर्भातील सर्व निर्णय सुकाणू समिती कडे देण्यात आले आहेत. तसेच प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. अविनाश वि. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🇱🇹 पालघर जिल्हा सुकाणू समिती 🇱🇹
१) डॉ. विवेक रा.पाटील (वाडा)
२) अविनाश वि. पाटील(पालघर)
३) एकनाथ रा. वेखंडे(वाडा)
४) आत्माराम वा.भोईर(वाडा)
५) प्रल्हाद के. शिंदे(वाडा)
६) विष्णू बांगो पाटील(वाडा)
७) तुकाराम अ. पष्टे(विरार)
८) राजन ज. नाईक(वाडा)
९) सौ. प्रतिभाताई पु. पाटील(वाडा)
१०) निलेश पां. जाधव(विक्रमगड)
११) राजेंद्र सि. पाटील(पालघर)
१२) रणधीर पाटील ( विक्रमगड)
डॉ विवेक रा. पाटील
सरचिटणीस
कुणबीसेना महाराष्ट्र प्रदेश