श्रीराम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशी सिंह यांच्या वाहनावर हल्ला केल्याचे प्रकरण बुधवारी दुपारी उघडकीस आले आहे. या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या काही कार्यकर्त्यांसह शशी सिंह चंद्रपूरहून पडोलीच्या दिशेने येत होते. वरोरा नाका कल्व्हर्ट जवळ त्याच्या वाहन क्रमांक MH.34-BF 7193 ला अज्ञात हल्लेखोरांनी समोरून धडक दिली आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला करून वाहनाची मागील काच पूर्णपणे तोडली.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन शशी सिंह आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून कसेबसे निसटून पडोली च्या दिशेने निघुन गेले. व तत्काळ पडोली पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार रमेश कोंढावार यांना घटनेची माहिती देण्यात आली.
मात्र घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांची तक्रार घेणे शक्य नसल्याने ठाणेदार कोंडावार ह्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शशी सिंगला आपल्या पोलीस वाहनातून रामनगर पोलीस ठाण्यात पाठविले.
या घटनेसंदर्भात, रामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर एपीआय बनसोड यांनी घटनेची पुष्टी केली असुन वृत्त लिहितस्तोवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.